औषधी नवलकोल भाजीकडे होतंय दुर्लक्ष; माहिती अभावी ग्राहकांची खरेदीकडे पाठ

medicine vegetable navalkol cultivation ignore by people in kolhapur
medicine vegetable navalkol cultivation ignore by people in kolhapur
Updated on

कोल्हापूर : गुणाने शीत असून पित्तशामक, पथ्यकर असूनही नवलकोल गड्ड्याकडे दुर्लक्ष केले जाते. नवलकोल भाजी करायची कशी, हेच अनेकांना माहिती नाही. खुद्द विक्रेत्यांनी ही भाजी अजून खाल्ली नाही, अशा प्रतिक्रिया मंडईत ऐकायला मिळतात. ही भाजी मोठ्या प्रमाणात मिळत नाही. जरी नवलकोलचे गड्डे विक्रीला आले तरी ते माहिती नसल्यामुळे अनेक जण घेत नाहीत. 

कोबी अन्‌ फ्लॉवरपेक्षाही कोवळ्या नवलकोलची भाजी उत्तम होते. कोल्हापूरच्या बाजापेठेत जो नवलकोल येतो, तो मिरज, पुणे किंवा बेळगावमधून. विशेषत: हिवाळ्यानंतर नवलकोल बाजारपेठेत येण्यास सुरवात होतो. तो आला तरी माहिती नसल्यामुळे दुर्लक्ष केले जाते. ज्यांना नवलकोलचे महत्त्व माहिती आहे, ते मात्र तो विकत घेतात. ते भाजीसाठी, सॅलडबरोबर नवलकोल वापरतात. नवलकोलच्या व्हाइट व्हिएन्ना, किंग ऑफ मार्केट, परपल टॉप, परपल व्हिएन्ना, अर्ली व्हाइट या सुधारित जाती आहेत. व्हाइट व्हिएन्ना ही जात कोकणात येते. ही जात कमी वेळात उत्पन्न मिळवून देते. शिवाय गड्डे लांब, गोलाकार, फिकट हिरव्या रंगाचे असतात. नवलकोलची लागवड पावसाळा, हिवाळ्यात केली जाते. पावसाळा, हिवाळ्यात नवलकोलचे पीक भरपूर उत्पन्न मिळवून देते. तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नवलकोलची शेती केली जात नाही.

काही ठिकाणीच अत्यल्प प्रमाणात नवलकोल जिल्ह्यातील काही भागात घेतला जातो. भाजी तर उत्तम होते; पण सॅलडबरोबर खाण्यातील चव वेगळीच असते. पाल्याचा उपयोग जनावरांना खाण्यासाठी होतो. नवलकोल ही ब्रॅसिकेसी कुलातील असून शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया. नवलकोल दिसायला काहीसा कोबीसारखा; पण कोबीप्रमाणे पाने नसतात. कोबीप्रमाणे ही भाजी वन्य कोबीपासून (ब्रॅसिका ओलेरॅसिया) कृत्रिम निवडीतून तयार झालेली आहे. ही वर्षायु वनस्पती मूळची युरोपातील. कोलराबी हे नाव जर्मन भाषेतील आहे. याचा अर्थ कॅबेज-टर्निप म्हणजे सलगम (टर्निप) सारखी चव, आकार असलेला कोबी असा आहे. या वनस्पतीचे खोड सलगमसारखे दिसते म्हणून या प्रकाराला ‘कोलराबी’ हे नाव दिले आहे. 

कुठे येतो नवलकोल ? 

भारतात नवलकोलची लागवड महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, आसाम येथे होते. नवलकोलच्या खोडापासून ‘क’ जीवनसत्त्व मिळते. महाराष्ट्रात हे पीक कोबी, फुलकोबीच्या पिकांत मिश्रपीक म्हणून घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com